ताज्या घडामोडीपुणे
पुण्यात 289 रुग्णांना डिस्चार्ज; 196 नव्या रुग्णांची नोंद
पुणे | पुण्यात आज, शनिवारी दिवसभरात 196 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची तर 289 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
पुणे पालिका हद्दीत 10 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 696 इतकी झाली आहे. शहरात 235 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2855 झाली आहे.
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 84 हजार 080 इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 72 हजार 529 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात आज एकाच दिवसात 6277 नमुने घेण्यात आले आहेत.
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.