एसटीच्या ताफ्यात २०० इलेक्ट्रीक बस दाखल होणार; चार्जिंग स्टेशनचीही संख्या वाढवली जाणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/पुणे-28-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात जुन्या झालेल्या एसटी बसेसची अवस्था दयनीय आहे. यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अशा १५ वर्ष जुन्या झालेल्या एसटी बस मोडीत काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येत्या वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बसची संख्या वाढविण्यार भर देण्यात आला असून, महामंडळाच्या ताफ्यात २०० इलेक्ट्रीक एसटी बस दाखल होणार आहेत. त्यामुळे आता पूर्वीपेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी महमंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षात पाच हजार इलेक्ट्रीक बस दाखल दाखल होणार असून पुणे विभागात २०० इलेक्ट्रीक बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. सध्या पुणे विभागात ६६ इलेक्ट्रीक बस आहेत. शंकरशेठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन आहे. मात्र, आता चार्जिंग स्टेशनची संख्या देखील वाढवली जाणार आहे. स्वारगेट आणि दापोडी येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीची परवानग्या घेण्यात आहेत. तर इतर सात ते आठ ठिकाणी देखील चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत.
हेही वाचा – संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी कारवाई, वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द
सध्या पुणे विभागाअंतर्गत ई-शिवाई ही एसटी बस छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर या मार्गांवर धावत आहे. आता साताऱ्याला पण ही इलेक्ट्रीक बसची सेवा सुरू करण्यात येणार आहे. पण बसची अपुरी संख्या असल्यामुळे तसेच केवळ एकच चार्जिंग स्टेशन असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. चार्जिंग स्टेशनची संख्या वाढल्यास प्रवाशांची वेळेची बचत होऊन त्यांचा प्रवास सुखकर होईल.