अधिवेशनात १७ विधेयके मंजूर,उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांची माहिती
पुणे : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये एकूण १७ विधेयके मंजूर झाली. तसेच विदर्भातील अनेक विषयांबाबत चर्चा झाली. तर अनेक महत्त्वाचे निर्देश दिल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली.
अधिवेशनाची माहिती देण्यासाठी डॉ. नीलम गोर्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. “३३ वर्षांनतर पहिल्यांदाच नागरपूर येथील अधिवेशनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विधानपरिषदेला नुकतेच १०० वर्षे पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने “विधानपरिषदेची वाटचाल’ पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.
हेही वाचा – राज्यपालांच्या हस्ते ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण
तसेच हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय, अधिवेशनाच्या ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणार्या ग्रंथ निर्मितीबाबतही चर्चा करण्यात आली. महिलांवरील अत्याचारांची तक्रार पोलीस ठाण्यात घेतली जात नाही. त्यासाठी नियमावलीची आवश्यकता असून केंद्र सरकारने दंडसंहिता तयार केली आहे. त्यानुसार कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी स्त्री आधार केंद्राने पुढाकार घेतला आहे, असेही डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात पायर्यांच्या सभागृहाचा आवाज जास्त होता. महायुतीला मिळालेले यश विरोधकांना पचलेले दिसत नाही. त्या नैराश्यातून चर्चा करण्यापेक्षा खूप मोठ्याने आक्रमक होणे असे दिसून आले, असे डॉ. नीलम गोर्हे या म्हणाल्या.