Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आगामी विधानसभा निवडणुकीत ५५ गृहनिर्माण संस्थांमध्ये ११७ मतदान केंद्रे

पुणे :  आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये (हौसिंग सोसायटी) मतदान केंद्र स्थापन केली जाणार आहेत. जिल्ह्यात ५५ गृहनिर्माण संस्थांमध्ये तब्बल ११७ मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे हडपसर मतदारसंघात आहेत.

आतापर्यंत शाळा, ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर सरकारी इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जात होती. मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच सोसायट्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली.लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पुणे शहरात, तसेच काही ग्रामीण भागातील ३६ मोठ्या सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.

मतदानाबद्दल जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदानाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून अनेक उपक्रम, योजना, स्पर्धा, कल्पना राबविल्या जात असतात.त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या आत मतदान केंद्र निश्चित करून मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरीदेखील अनेक वेळा मतदानाच्या दिवशी मतदारांत निरुत्साह दिसून येतो.

हेही वाचा –  राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, विधानसभा स्वतंत्र लढणार

विशेषत: पुणे, मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या आहेत. अशा इमारतींच्या सोसायट्यांमध्ये हजारोंच्या प्रमाणात लोकसंख्या असते. त्यातच दैनंदित कामाच्या वेळा, मतदानाबद्दल अनुत्सुकता, मतदान केंद्र लांब असणे, तेथील रांगांमुळे मतदानासाठी लागणारा वेळ.

अशा अनेक कारणांमुळे मतदार मतदान करण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशा मोठ्या सोसायट्यांच्या आवारातच मतदान करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून या निर्णयाची व्याप्ती वाढविण्यासाठी सुरुवात केली आहे.

या मतदार यादीत ४४ लाख ९१ हजार ६८ पुरुष, ४१ लाख ५५ हजार ३३० महिला व ७७४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंख्येसाठी जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदान केंद्रे असतील.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button