हाॅर्न वाजवू नये ; वाहनचालकांमध्ये जनजागृती
पिंपरी- स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान व पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरक्षा पंधरवडा सुरु असल्याने वाहनचालकांमध्ये ‘हॉर्न वाजवू नका’ याबाबत जनजागृती करण्यात आली.
२८ एप्रिल ते ७ मे हा कालावधी रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करण्याचे राज्यशासनाचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर आज चिंचवड वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने एस.के.एफ. कंपनीजवळील मुख्य रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना थांबवून सुरक्षा नियमांचे बेल्ट प्रदान करण्यात आले. तसेच चार चाकी व मोठ्या वाहनांना हॉर्न न वाजविण्याविषयी सांगण्यात आले. वाहतूक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश लोंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, अंशुल प्रकाशनचे विजय जगताप, पत्रकार मदन जोशी, उदय वाडेकर, कांती रिक्षा संघटनेचे श्रीधर काळे, प्रभाकर पवार आदींनी यामध्ये सहभाग घेतला.