हभप सोपान महाराजांवर आळंदीत अंत्यसंस्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/1574144177.jpg)
आळंदी |महाईन्यूज|
संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांच्या पार्थिवावर आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर अतुल महाराज आळशी यांच्या पार्थिवावर खेड तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोपान महाराज नामदास यांच्या अकाली निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे. अनेक मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, मंहत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीस सोपान महाराज नामदास यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी आळंदी, पंढरपुरसह संपूर्ण राज्यातून भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी, सोपान महाराज नामदास यांचे पार्थिव विष्णू मंदिरात अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यविधी पूर्वी हरिनामाच्या गजरात मंदिर व ग्रामप्रदक्षिणा घालण्यात झाली. शोकाकूल वातावरणात भाविक व वारकरी संप्रदायाच्या उपस्थित हरिनाम जयघोषात त्यांचे अत्यंसंस्कार करण्यात आले. पंढरपूरमधील नामदेव मंदिरात काल (मंगळवार) संपूर्ण दिवस शुकशूकाट होता.