breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सोलापूरात कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन विनोद आप्पाराव रवळे (वय-३१) या तरूण शेतकºयाने आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आला.

शेतात सोयाबीन लावण्यात आले आहे. रात्री लाईट येत असल्याने विनोद रवळे हा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी म्हणुन शेतात गेला होता. शेतात त्याने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ७ वाजता उघडकीस आला. नातेवाईकांनी विनोद रवळे याला खाली उतरवले तेव्हां तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालता दाखल करण्यात आले होते.

सकाळी १0.३५ वाजता उपचारादरम्यान विनोद रवळे याचा मृत्यु झाला. विनोदच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. विनोद रवळे याच्या आत्महत्येची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button