Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
मुरली शर्मावर दुःखाचा डोंगर , आईचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

गोलमाल, मैं हू ना यांसारख्या अनेक चित्रपटांद्वारे आपले मनोरंजन करणाऱ्या मुरली शर्मावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे ७ जूनला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुरली यांच्या आईचे नाव पद्मा असून त्या ७६ वर्षांच्या होत्या.
पद्मा यांचे निधन त्यांच्या मुंबई येथील राहात्या घरी झाले. मुरली शर्माला त्याच्या आईच्या निधनाचा चांगलाच धक्का बसला आहे. त्याच्या वडिलांचे निधन गेल्याच वर्षी झाले होतं. सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने अतिशय कमी नातेवाईकांच्या आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत पद्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.





