सुभाष देशमुखांच्या “लोकमंगल समुहा’वर सेबीची टाच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/subhash-deshmuk.jpg)
मुंबई – आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल समुहा’वर सेबीने टाच आणली आहे. सेबीने लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्री आणि 7 संचालकांवर शेअर बाजारात चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच कंपनीने गंतवणूकदारांकडून बेकादेशीरपणे जमा केलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले आहे.
भागधारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही जप्तीची कारवाई केली. देशमुखांसह त्यांच्या नातलगांनी केलेले व्यवहार ही भागधारकांची फसवणूक असल्याचा आरोप आहे.
सेबीने लोकमंगल समुहाचे संचालक स्मिता देशमुख, वैजनाथ लातुरे, औंदुबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना अप्पारा तेली, महेश देशमुख आणि पराग पटेल यांच्यावर बंदी घातली आहे. सेबीच्या नियमांचे उल्लंघन करत कंपनीने 2009-10 ते 2012-13 या काळात 4,571 गुतंवणूकदारांकडून 74.82 कोटी रुपये जमा केले. यामुळे ही रक्कम वार्षिक 15 टक्के व्याजासह गुंतवणूकदारांना परत करण्याची सूचना सेबीने दिली.
मात्र, सेबीच्या कारवाईनंतर देशमुखांनीच सेबीवर पलटवार केला. ज्यांना आपले शेअर्स पाहिजेत, त्यांना आम्ही ते परत करु, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले. सेबीचे नियम माहित नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कारखाना काढताना आम्ही सेबीचे नियम माहित नव्हते. त्यामुळे ज्या भागधारकांना आपले शेअर्स पाहिजे आहेत, त्यांना आम्ही ते परत करु, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले.
लोकमंगलने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी पैशात खरेदी केल्या. या जमिनींची आजची किंमत 108 कोटी रुपयांच्या घरात आहे. ही रक्कम दहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना परत करण्याचा सूचना सेबीने दिल्या आहेत. म्हणजेच लोकमंगलला आता शेतकऱ्यांना 120 कोटी रुपये परत करावे लागणार आहेत.