breaking-newsपुणे

ससून रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लक्षणे

पुणे | महाईन्यूज

पुण्यातील ससून रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यानंतर आता तीन नर्ससहित डॉक्टरांनाही आयसोलेट करण्यात आलं आहे. याआधीच ससूनमधील तीन नर्स पॉजिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती.

ससूनमधील कोरोना वार्डातील 3 नर्सना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे, भवानीपेठेतील पालिकेचं सोनवणे रूग्णालयही सील बंद करण्यात आलं आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेले डॉक्टर आणि नर्स कोरोना रूग्णाच्या संपर्कात आले होते, अशी माहिती आहे. पुण्यात सर्वाधिक 85 पेशंट भवानी पेठेत आढळले आहेत.

ससूनमध्ये आतापर्यंत 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ससूनमधील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांचा टास्कफोर्स करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button