Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोनाग्रस्ताची रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई | देशभरासह राज्यातही कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच एका कोरोनाग्रस्ताने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबईतील नायर रुग्णालयात 29 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेने आत्महत्या केली आहे. रुग्णालयातील बाथरुममध्येच महिलेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील अधिक तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button