Breaking-newsपुणे
संपूर्ण शहरात गुरुवारी पाणी नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Tap.jpg)
पुणे:- पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (७ नोव्हेंबर) विद्युत आणि पंपिंग तसेच स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.