संपुर्ण देश शहीद जवानांच्या कुटूंबियांच्या पाठीशी – शरद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/3Sharad_Pawar_27.jpg)
बारामती: पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. मात्र देशाचं संरक्षण करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला अपयश आल्याचं हे निदर्शक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी आज त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही. संपूर्ण देश आज शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. निवडणुकीपूर्वी 56 इंच छाती असलेले नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या सरकारवर असे हल्ले झाल्यानंतर, तुम्ही निषेध पत्र पाठवता अशी टीका करत सरकारला धारेवर धरायचे. आता मात्र पुलवामा इथे झालेल्या हल्ल्यानं नरेंद्र मोदींची अकार्यक्षमता सिद्ध झाल्याचं पवार म्हणाले.