breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिरुरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांवर पोलिस अधिक्षकांची कारवाई

पुणे – पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिरूर तालुक्यातील दोन बड्या नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात एकाने फिर्याद दिली आहे. बांदल यांचा तालुक्यात वेगळ्या अर्थाने दबदबा असल्याने त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत तक्रार झाली नव्हती. अखेरीस या प्रकरणी तब्बल 90 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला.

दुसरी मोठी कारवाई जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यावर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी व त्यांच्या लुंकड नावाच्या साथीदाराने पैशासाठी दिलेल्या त्रासाने तक्रारदाराला आत्महत्येची वेळ आली होती. त्यांच्यावरही अखेरीस कारवाई झाली. तालुक्यातील दोन राजकीय नेत्यांवर एकाच दिवशी कारवाई झाल्याने सर्वत्र याच प्रकरणांची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button