breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रम

पुणे |महाईन्यूज|

माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने दि. 12 ते 14 डिसेंबर दरम्यान, नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला जातो. परंतु, यंदा करोनामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या गुणवत्तावाढीसाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ऍड. संदीप कदम यांनी दिली.

ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट, रोबोटिक्स मॉडल मेकिंग स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, संशोधन अविष्कार, राज्यस्तरीय एकांकिका व काव्यलेखन स्पर्धा, शरदचंद्र पवार यांना शुभेच्छा पत्र लेखन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, नादमधुर कविता स्पर्धा, शाळा व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण तसेच 80 हजार सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऑनलाइन “शारदा व्याख्यानमालेचे उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते होईल. तर समारोप खासदार श्रीनिवास पाटील, खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत होईल.

व्याख्यानमालेत डॉ. तनुजा नेसरी, डॉ. विवेक सावंत, डॉ. राम ताकवले, डॉ. अनंत फडके, पक्षीमित्र किरण पुरंदरे यांची व्याख्याने होणार आहे. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या सर्व उपक्रमांचा विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार, सहसचिव आत्माराम जाधव यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button