breaking-newsपुणे

व्हाट्स अ‍ॅपवरून व्हिडिओ कॉल करून विनयभंग

पिंपरी |महाईन्यूज|

व्हाट्स अ‍ॅपवरून व्हिडिओ कॉल करून अश्लिल चाळे केले. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ३) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाइलवर व्हाट्स अ‍ॅपवर एका आरोपीने अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल केला. फिर्यादी यांनी कॉल रिसिव्ह केला असता, आरोपी नग्नावस्थेत असल्याचे व्हिडिओ कॉलमधून दिसून आले. तसेच आरोपी याने त्याचा चेहरा लपवून ठेवून अश्लिल चाळे केले. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून आरोपी याने फिर्यादी यांचा विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button