Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
लोकसभा निवडणूक: सरिता बारणे यांच्या उपस्थितीत माथेरानमध्ये महायुतीची प्रचार रॅली
नेरळ: शिवसेना, भाजप, रिपाई, रासप रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ माथेरानमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. सरिता श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत काढलेल्या प्रचारफेरीत बारणे यांना माथेरान तसेच कर्जत तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देणार व बारणे यांना विजयी करणार असा विश्वास प्रसाद सावंत यांनी व्यक्त केला.
रॅलीमध्ये शिवसेना नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, शिवसेना महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेंद्र थोरवे, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका संघटक राजेश जाधव, भाजप शहराध्यक्ष विलास पाटील, माजी नगराध्यक्ष बबिता शेळके, आरपीआय शहराध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यासह नगरसेविका सोनम दाभेकर, प्रतिभा घावरे, ज्योती सोनावणे, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, प्रदीप घावरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीची सुरुवात हॉटेल सन अँड सॅण्ड पासून झाली. रॅलीमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे या देखील उपस्थित होत्या, यावेळी सरिता बारणे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येथील श्रीराम मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढवला. रॅलीतील कार्यकर्त्यानी ‘कोण आला रे कोण आला, महायुतीचा वाघ आला’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच घरोघरी पत्रक वाटून बारणे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी मतदारांना केले.