breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून ‘कोविड योद्धा’चा सन्मान!

पुणे | प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून आपण कोरोना महामारीला तोंड देतोय. या काळात आपल्यातील काहीजण दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले तर काहीजणांनी कोरोनावर खंबीरपणे यशस्वी मात केली. आजही आपण या कोरोनाशी दोन हात करतोय आणि यात कोरोनाची हळूहळू पिछेहाट होतेय, ही समाधानाची बाब आहे. याचं श्रेय हे आपल्या प्रत्येकाचं असलं तरी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार याचं योगदान अधिक आहे, हे विसरता येणार नाही. याशिवाय महावितरण कंपनी, पाणीपुरवठा, स्थानिक स्वराज्य संस्था इथल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अत्यंत सचोटीने काम केलं, किंबहुना ते नेहमीच ही जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात, हे आपण विसरु शकत नाही. त्यामुळं हे सर्वजणही कोरोना योद्धे आहेत, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

रोहित पवार म्हणाले की, या कोरोना योध्यांपैकी कित्येकजण तर आठ-आठ, पंधरा-पंधरा दिवस घरी जाऊ शकले नाहीत. अजूनही त्यांचा संघर्ष सुरूच आहे. त्यांच्या या समर्पण वृत्तीला, त्यागाला मी सलाम करतो. त्यांच्या कामाचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे पण तरीही फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचा सन्मान करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य समजतो.

त्’कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’च्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील कोरोना योध्यांचा सन्मान सोहळा काल आयोजित केला होता. या सोहळ्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार, पंचायत समिती, नगरपंचायत, महावितरण कंपनीतील कर्मचारी या सर्व कोरोना योध्यांचा ‘कोव्हिड योद्धा’ म्हणून सन्मान केला. यावेळी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

असाच कार्यक्रम कर्जत तालुक्यातील उर्वरीत कोरोना योध्यांसाठी आणि जामखेड तालुक्यासाठीही पुढच्या काही दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button