breaking-newsपुणे

येरवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून फोडल्या सहा गाड्यांच्या काचा

विमाननगर – येरवड्यातील नवी खडकी शिवाजी पुतळा परिसरात सोमवारी (28 ऑक्टोबर) पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी सहा गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना समोर  आली आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील नवी खडकी शिवाजी पुतळा परिसरात सोमवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी सहा गाड्यांवर दगडफेक केली. तसेच सहा गाड्यांची तोडफोड केली.  या गंभीर घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळी आठ ते दहा अज्ञात हल्लेखोरांनी या गाड्यांची तोडफोड केली. घटनास्थळी येरवडापोलिसांनी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील व्यसनाधीन  अल्पवयीन बालगुन्हेगारांनी हे कृत्य केले असावे असा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button