Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मोदींच्या पुस्तक विरोधात ‘फर्ग्युसन’मध्ये आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/7-11.jpg)
पुणे |महाईन्यूज|
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याच्या निषेधार्थ फर्ग्युसन कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी सोमवारी निदर्शने केली.
जयभगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी दिल्लीत प्रकाशन झाले. त्यानंतर देशभर या पुस्तकाला विरोध सुरू झाला आहे. फर्ग्युसन कॉलेजमधील काही पुरोगामी विचारांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालयाच्या आवारात निदर्शने केली. या पुस्तकावर बंदी आणून त्याची विक्री रोखावी, अशी मागणीही त्यांनी केली. वातावरण बिघडू नये यासाठी पोलिस या वेळी उपस्थित होते.