Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मुलीच्या मैत्रिणीचा विनयभंग; 55 वर्षीय व्यक्तीला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/black-man-arrested-1-2.jpg)
मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या घरी आलेल्या 15 वर्षीय मुलीचा विनयभंग तिच्या वडिलांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना गुरुवारी (10 मे) लष्कर परिसरात घडली. लष्कर पोलिसांनी याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. 15 वर्षीय मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तिची मैत्रिण लष्कर परिसरात शेजारी-शेजारी राहतात. गुरुवारी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती तिच्या घरी गेली होती. यावेळी तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी ‘तू किती छान दिसतेस’ असे म्हणत तिच्याशी अश्लील बोलत तिच्या शरीरावरून हात फिरवला. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने आपल्या कुटूंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. तक्रारीनंतर आरोपीला अटक केली असून लष्कर पोलीस अधिक तपास करित आहेत.