मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मंगळवारी अर्धा तास बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/727656-mumbai-pune-expressway-05.jpg)
मुंबई – आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अर्धा तास बंद राहणार आहे. ‘महावितरण’ची उच्चदाब क्षमतेची वीज वाहिनी टाकण्यासाठी मुंबई-पुणे दृतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) मंगळवारी बंद असेल. दुपारी एक ते दीड दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतुक बंद असणार आहे. महामार्गावर परंदवाडी येथे ‘महावितरण’च्या उच्चदाब क्षमतेच्या वीजवाहिनीमध्ये झालेल्या बिघाडाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक अर्धा तास बंद ठेवण्यात येणार आहे.
मंगळवारी दुपारी मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्ध्या तासासाठी बंद करण्यात येईल. परंदवाडीपासून अर्धा किलोमीटर अंतरावरील सर्व प्रकारची अवजड, माल वाहतूक करणारी वाहने थांबविण्यात येणार आहेत. मुंबईकडे जाणारी हलकी आणि प्रवासी वाहने किवळे पुलापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहेत. तसेच, पुण्याकडे येणारी हलकी, चारचाकी तसेच प्रवासी वाहने ही उर्से टोलनाका येथून जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.