‘मी कसा का असेना, पण चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले – अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/अजित-पवार.png)
पुणे |महाईन्यूज|
‘मी कसा का असेना, पण चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे. तर पवारसाहेब हे चार वेळा मुख्यमंत्री होते म्हणून मीदेखील चार वेळा उपमुख्यमंत्री झालो,’ असं अजित पवार यांनी साखर कारखान्यांच्या सभेत म्हणतात एकच हशा पिकला.
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
याप्रसंगी मागील सत्ताधा-यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘तुमची राज्यात सत्ता होती. तसेच तुमच्या विचाराचे मंत्री होते. तुम्ही अशा पद्धतीचे राजकारण करू पाहात असाल तर आम्ही पण चार-चार वेळेला मुख्यमंत्रिपद पाहिलेले लोक आहोत. आणि आता कसे का असेना, पण चार वेळा उपमुख्यमंत्रिपद पाहिले आहे,’ अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर पवार यांनी आपण घरी असून घरी सभा खेळीमेळीत व्हावी म्हणून असं बोलल्याचं स्पष्टीकरण दिलं.