Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मनसेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश लोखंडे यांची नियुक्ती

आळंदी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा उप संघटकपदी मरकळ येथील मनसैनिक अविनाश लोखंडे यांची निवड करण्यात आलेली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि रस्ते आस्थापना विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोखंडे यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना नियुक्ती पत्र प्रदेश सरचिटणीस योगेश चिले व जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ भांडवलकर यांच्या उपस्थित देण्यात आले.

यावेळी खेड तालुका सचिव प्रसाद बोराटे, निलेश घुंडरे, बाळु नेटके, किरण नरके, शुभम लोखंडे, शर्देश ठाकूर, संकेत लोखंडे, वाल्मिक कोतवाल, अभिजित लोखंडे, सौरभ पाचपुते, शंकर पाचपुते महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते. रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना चांगल्या प्रतीच्या होण्यासाठी मनसेचा हा विभाग सक्रियपणे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हास्तरीय पदावर अविनाश लोखंडे यांची नियुक्ती केलेली आहे.

खड्डे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रशासनाला जाब विचारून असुविधांची कोंडी फोडण्यासाठी हा विभाग उपयुक्त ठरेल, तसेच पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करून दबावगट तयार केला जाईल व अहवाल सादर करून कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button