पुणे
भोसरीत आज ‘जश्न-ए-ईद-मिलन’; आमदार महेश लांडगे यांचे संयोजन

– पालकमंत्री गिरीश बापट यांची उपस्थिती
पिंपरी- ‘उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडमधील सर्वधर्म बंधुभाव आणि सामाजिक एकोपा कायम रहावा, असा संदेश देत शहरातील सर्वात मोठी ‘जश्न-ए-ईद-मिलन’ भोसरी येथे आज, दि.२ जुलै रोजी साजरी होत आहे. रमजान ईदनिमित्त आमदार महेश लांडगे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे या सोहळ्याचे संयोजन केले आहे.
भोसरी येथील कै. अंकुशराव काकडे सभागृहात दि.२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘जश्न-ए-ईद-मिलन’चा दिमाखदार कार्यक्रम होणार आहो. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समजाकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आझम पानसरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन भाईजान काझी यांनी केले आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी रमजान ईदनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला शहरातील हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी होत असतात. यावर्षी सुलतान नाझॉं कव्वाल यांच्या कव्वालीचा कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भाईजान काझी यांनी केले आहे.





