Breaking-newsपुणे
भाजपच्या ‘घर चलो’ अभियानास चिंचवडला उत्स्फूर्त प्रतिसाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/ghar-chalo-abhiyan-photo-1.jpg)
पिंपरी – चिंचवड येथील प्रभाग क्रमांक १९ भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शितल शिंदे यांच्या वतीने ‘घर चलो’ अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिकांचा या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या अभियानात नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शितल शिंदे, शहर कार्यकारणी सदस्य बिबिषण चौधरी, प्रमोद ननावरे, हेमंत ननावरे, संतोष शिंदे, चैत्यन्य आहेर, अभिजित डागलीया, अनिरुद्ध संकपाळ, निलेश देवधरे, विशाल कुलकर्णी, श्रीनिवास रेड्डी, संजय अरबूज, विलास वैद्य, भाई राऊत, अशोक ब्यानर्जी, विकास पिल्ले, किशोर शिंदे आदी यावेळी कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शितल शिंदे म्हणाले की, शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार करून आम्ही नागरिकांना जस्तीत जास्त लाभ कसा मिळेल याची महिती नागरिकांना देत आहेत. तसेच अभियनाच्या दरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. भाजप घर चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचे तसेच सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण नगरसेवक शितल शिंदे यांनी केले.