Breaking-newsपुणे

भरकटलेल्या काळविटाचा अखेर मृत्यू!

  • हडपसर भागात काळवीट आढळले; कात्रज उद्यानात मृत्यू

पुणे – हडपसर भागात कालव्यालगत शुक्रवारी सकाळी काळवीट आढळून आले. नागरिकांनी नागरी वस्तीत भरकटलेल्या काळविटाला पाहताच अग्निशमन दल तसेच वन विभागाला ही माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काळविटाला जाळ्यात पकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल केले. दरम्यान घाबरलेल्या काळविटाचा कात्रज येथील रुग्णालयात दुपारी मृत्यू झाला.

दौंड आणि भिगवण परिसरात मोठय़ा संख्येने काळवीट, हरीण, सांबर आहेत. बारामती तालुक्यात त्यांच्यासाठी राखीव क्षेत्र तयार करण्यात आले आहे. दौंड आणि भिगवण भागातून एक काळवीट कालवामार्गे हडपसर भागात सकाळी आले. खडकवासला धरणातून पाणी सोडणे बंद केल्यानंतर सध्या कालव्यात पाणी नाही. हडपसर भागातील उन्नतीनगर, सातववाडी परिसरात सकाळी काळवीट आढळून आल्याने नागरिकांनी तातडीने पोलीस, अग्निशमन दल तसेच वन विभागाला ही माहिती दिली. काळविटाला पाहण्यासाठी या भागात गर्दी झाली होती.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी काळविटाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळ्यात पकडून काळविटाला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर पकडलेल्या काळविटाला कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात नेण्यात आले. त्याच्या चेहऱ्यावर किरकोळ स्वरूपाची जखम झाली होती. दरम्यान, उपचार सुरू असताना दुपारी काळविटाचा प्राणिसंग्रहालयात मृत्यू झाला. काळविटाच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनात मृत्यूमागचे कारण समजू शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पाण्यात पडल्याने काळविटाला न्यूमोनिया झाल्याची शक्यता आहे. तसेच नागरिकांच्या आवाजामुळे काळवीट भेदरून गेले असावे. त्या धक्क्य़ाने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button