पुण्यात हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचं स्वागत करण्यासाठी वापरली अनोखी पद्धत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-30.jpg)
मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स फूड कोर्टस, रेस्टॉरंट्स आणि आणि बार सुरू झाले आहेत.
पुण्यातही प्रसिद्ध हॉटेल्स आज सुरू झाले आहेत. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचं स्वागत करण्यासाठीही अनोखी पद्धत वापरली आहे. यात काय नविन योजना आखल्या आहेत ते जाणून घेऊयात
ग्राहकांची तपासणी
सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी, असे आदेश प्रशासनानं दिल्यानंतर त्याती अमलबजावणीही सुरू झाली आहे.
कर्मचाऱ्यांकडून खबरदारी
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही योग्य ती खबरदारी घेत मास्क आणि फेस शिल्डचा वापर करत ग्राहकांना सेवा देत आहेत.
आसन व्यवस्था
हॉटेलमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी अंतर राहील, अशी आसन व्यवस्था हॉटेलच्या व्यवस्थापकांकडून करण्यात आली आहे.