Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात बांधकाम व्यवसायिकावर सराईत गुंडाने केला गोळीबार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/14Gun_20Shoot.jpg)
पुणे – किरकोळ कारणावरुन दोन गटात झालेल्या भांडणानंतर सराईत गुन्हेगाराच्या माणसांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार केला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता हांडेवाडीजवलील सातवनगर परिसरात घडली.
सातवनगर परिसरामध्ये काल रात्री दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. त्याचे रूपांतर हत्यारांचा वापर करुन मारामारीमध्ये झाले. दरम्यान या प्रकरणमध्ये एका सराईत गुंडाने उडी घेतली. त्यानंतर गुंडाच्या माणसांनी बांधकाम व्यावसयिकाच्या घराच्या परिसरात जाऊन त्याच्या गाडीवर गोळीबार केला.