breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात तलावाजवळ फेकलेल्या जुळ्यांचे आई-वडील सापडले; बाळांची आई विधवा

पुणे | महाईन्यूज

आठ दिवसांपूर्वी पुण्यातील पाषाण तलावाजवळ सकाळ-सकाळी दोन जुळी मुलं सापडली होती. अज्ञात आई-वडिलांनी त्यांना तलावाजवळ सोडले होते. त्या जुळ्या मुलांच्या आई-वडिलांना शोधण्यात चतुःश्रृंगी पोलिसांना यश आलंय. प्रेमप्रकरणातून या बाळांचा जन्म झाल्याची माहिती समोर आलेली आहे. संतोष नागनाथ वाघमारे (वय ३०, रा. घुले नगर वडगाव बुद्रुक ता. हवेली) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

ण्यात 14 जानेवारी रोजी सकाळी पाषाण तलावाजवळ दोन जुळी मुलं सापडली होती. तलाव परिसरातील सुरक्षा रक्षकांना ही मुलं सापडलेली होती. ससून रुग्णालयात त्यांची रवानगी करण्यात आली होती. पण, या मुलांचे आई-वडील कोण? असा प्रश्न उपस्थित झालेला होता. मुलांच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागलेली होती. आठ दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना बाळांच्या आई-वडिलांना पकडण्यात यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार धायरी परिसरात संबंधित आई-वडील लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. संबंधित महिला विधवा आहे. तिला आधीच तीन मुली आहेत. त्यानंतर या दोन जुळ्या बाळांचा जन्म झालेला आहे. त्यामुळं त्यांनी दोन्ही बाळांना तलावाजवळ सोडल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून बाळांचे आई-वडील दोघांनाही ताब्यात घेतले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button