Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात गॅसचा भीषण स्फोट होऊन इमारत कोसळली, 4 चार जण गंभीर जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/wadgaon-sheri.jpg)
पुणे – वडगावशेरी येथे बुधवारी सकाळी सहा वाजता घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे इमारत कोसळली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी एक महिला चहा बनवण्यासाठी गॅस सुरू करत असताना हा भीषण स्फोट झाला. वडगावशेरीच्या गणेशनगर भागातील या घटनेनंतर आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरे बसले.
या दुर्घटनेत बाळासाहेब आप्पाजी भोंडवे (वय 50), नीरा बाळासाहेब भोंडवे (वय 45), अनुराधा बाळासाहेब भोंडवे (वय 20) आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.