breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील ‘या’ भागांचा कंन्टेन्मेंट झोनमध्ये समावेश

पुणे |महाईन्यूज|

शहराच्या उपनगरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पुणे महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बदल केला असून, कोंढवा, सिंहगड रोड, शिवाजीनगर, वडगाव शेरी भागातील काही क्षेत्र नव्याने प्रतिबंधित केले आहे.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आज नव्याने 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून हडपसर, कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड , नगर रोड आदी उपनगरांच्या भागांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याचे दिसून आले. याच कारणांसाठी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली असून, आता शहरांमध्ये हे एकूण 71 प्रतिबंधित क्षेत्र असतील. या भागात महापालिकेने काही निर्बंध लागू केलेले आहेत.

नव्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये धनकवडी, बालाजीनगर , सिद्धी हॉस्पिटल परिसर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, पवार हॉस्पिटल परिसर, रजनी कॉर्नर; कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कोंढवा बुद्रुक, शांती नगर सोसायटी आणि साळवे गार्डन परिसर, कपिल नगर, लक्ष्मी नगर , साई नगर गल्ली नंबर 1 ते 9; सिंहगड रोड परिसरातील वडगाव खुर्द, मॅंगो नेस्ट सोसायटी, सन सिटी रोड, आनंदनगर, धायरी गल्ली नंबर 17; शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील शिवाजीनगर भांबुर्डा, आशा नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखलेनगर, वडगाव शेरी येथील कुमार प्राईम वेरा, घोरपडी येथील पाम ग्रु सोसायटी, घोरपडी लक्ष्मी टेरेस सोसायटी आदी नव्या भागांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पूर्वीचे कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, पर्वती लक्ष्मी नगर, गुरुवार पेठ, महात्मा फुले, घोरपडी पेठ, वारजे कर्वेनगर ,कोथरूड, बावधन, औंध ,बाणेर परिसरातील पूर्वीचा भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कायम आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button