पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकला श्रीलंकेचा माजी क्रिकेटर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/7-7.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगणार आहे. शुक्रवारी रंगणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहेत. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर आणि सध्याच्या घडीला समालोचक म्हणून कार्यरत असलेले रसेल अरनॉल्डही या सामन्यासाठी पुण्यात आले आहेत. त्यांना पुण्यातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ शेअर केला. अरनॉल्डने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करताना ‘ओह डिअर! आता कुठे जायचं? असे कॅप्शनही दिल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
अरनॉल्डने श्रीलंकेच्या संघाकडून ४४ कसोटी सामन्यात १ हजार८२१ धावा केल्या आहेत. यात १० अर्धशतके आणि ११ बळींचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८० सामन्यात त्याने ३ हजार ९५० धावा आणि ४० विकेट्स घेतल्या आहते.