breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्याचं मावळा पगडी मेट्रो स्टेशन

मुंबईः पुण्यातील मंगळवार पेठ येथील मेट्रो स्थानकाला ‘मावळा पगडी’ चा लुक देण्यात येणार आहे. वनाज ते रामवाडी मार्गावरील सात एलिव्हेटेड स्थानकांपैकी एक स्थानक असलेल्या स्टेशनला पुण्याची सांस्कृतिक छबी दिसून यावी यासाठी पारंपारिक स्वरूप देण्याचं ठरवण्यात आलं आहे.

शहरातील मेट्रोच्या विविध स्थानकांचीही पारंपरिक रचना करण्याचे महामेट्रोने ठरविले आहे.टेक्ला स्ट्रक्चरच्या बीआयएम सॉफ्टवेअरच्या माध्यामातून ही अनोखी रचना तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीचा वारसा जपत त्या प्रेरणेने मावळा पगडी ची संकल्पना अस्तित्वात आणण्यात आली.

अवश्य वाचाः महामेट्रोच्या खोदकामात सापडले अज्ञात प्राण्याचे जीवाष्म

या पगडीचं मॉडेल तयार करण्याचं काम पुण्यातील टेलजी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलं होतं. पुण्यातील नागरिकांना अत्यंत दिमाखदार सांस्कृतिक मेट्रो स्थानकावरून प्रवास करण्याची संधी आता मिळणार आहे.    

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button