पुणे: ५ व ६ वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/Atyachar.jpg)
पिंपरी : पाच आणि सहा वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार पिंपरीगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी १४ व १६ वर्षीय आरोपी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शाळेत मुलींना शिक्षकांनी ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याबाबत माहिती दिली. त्यानंतर या मुलींनी आपल्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यावर चार महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिलेने याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरीगाव येथे ३ जानेवारी ते १८ एप्रिल या कालावधीत १४ आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलांनी फिर्यादी महिलेच्या पाच आणि सहा वर्षीय बालिकांवर लैंगिक अत्याचार केले. शाळेमध्ये मुलींना शिक्षकांनी गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती दिली. त्यानंतर या मुलींनी या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षकांनी ही बाब मुलींच्या पालकांना सांगितली. फौजदार रत्ना सावंत या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.