breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा- अजित पवार

मुंबई – पुणे ‘स्मार्टसिटी’ अंतर्गत होणारी कामे दर्जेदार तसेच मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्या. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करा. हे करताना पुणे ‘स्मार्ट सिटी’चे रँकिंग राष्ट्रीय पातळीवर कसे सुधारेल यासाठीही आपला प्रयत्न असला पाहिजे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. ‘पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या ‘स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम’ची चौथी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती.

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करावे. स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु करण्यात आलेली ‘कमांड कंट्रोल रुम’ अधिक चांगल्याप्रकारे कार्यान्वित करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. ‘कोरोना’ संकटाचा सामना करत असताना स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या सर्व प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. देशपातळीवर पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button