Breaking-newsपिंपरी / चिंचवड

अग्रसेन महाराज जन्मोत्सवानिमित्त चिंचवडमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

अग्रवाल समाजाचे कुलपिता, सत्य, अहिंसा आणि समाजवादचे प्रणेता महाराजा श्री अग्रसेन यांच्या जन्मोत्सवानिमित्त चिंचवड प्राधिकरण अग्रवाल समाज ट्रस्टच्या वतीने अग्रसेन जंयती महोत्सवाचे आयोजन चिंचवड येथील अग्रसेन भवन येथे करण्यात आले आहे.

यामध्ये 26 सप्टेंबर पासून  4 ऑक्टोंबरपर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. तसेच, श्री अग्रसेन ट्रस्टच्या वतीने  अनेक रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती समाजाचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल यांनी दिली.

भीमसेन अग्रवाल म्हणाले की, 29 सप्टेंबर रोजी सांयकाळी 4 वाजता श्री अग्रसेन महाराज यांची भव्य शोभा यात्रा तुळजाभवानी मंदिर येथून चिंचवडच्या अग्रसेन भवनपर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर भवनध्ये महालक्ष्मीची महाआरतीचे होईल. यावेळी अडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र राज्य संजीवकुमार सिंघल आणि मित्तल ग्रुपचे नरेश मित्तल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, यावेळी हुशार विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून  सन्मान करण्यात येणार आहे.

4 ऑक्टोंबर रोजी भजनगायक नरेश सैनी, रमेश ओबेरॉय, अंजली सागर आणि मुकेश गोयल प्रस्तुत करतील. यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.   

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button