breaking-newsपुणे

पुणे शहरात 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर

पुणे : पुण्यातील कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन पुणे’ हाती घेतले आहे. त्यानंतर प्रशासनाने पुणे शहरात नव्याने 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.

कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने शहरात नव्याने 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील व्यवहारांसह रहिवाशांवरही काही बंधने राहणार आहेत. या भागातील व्यापारी आणि रहिवाशांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.

शहरातील मायक्रो कंटेन्मेंट झोन

पर्वती दर्शन, सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, मनपा कॉलनी, पर्वती, दत्तवाडी, गाडगीळ दवाखाना परिसर, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, पर्वती, महात्मा फुले नगर, लक्ष्मी नगर, गणेश पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, पुणे रेल्वे स्थानक परिसर, ताडीवाला रस्ता, हडपसर, मुंढवा, घोरपडीजवळील भीमनगर.

हडपसर, घोरपड़ी, पंचशीलनगर, आगवाली चाळ, कोरेगाव पार्क, कवड़ेवाडी, कात्रज, नवीन वसाहत, कात्रज गावठाण, बहिरट चाळ, बाबर डेअरी जवळ, पर्वती, गवळीवाडा सहकारनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, के.के. मार्केट जवळ, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, न्यू स्त्रोत नगर सोसायटी, येरवडा, धानोरी शांतीनगर, आळंदी रस्ता, कळस गावठाण, माळवाडी परिसर, धानोरी, टिंगरेनगर, मुंजोबा वस्ती, कळस-विश्रांतवाडी, वडारवस्ती, हडपसर, गोसावी वस्ती, वैदुवाडी, वानवडी गावठाण, वानवडी, एसआरपीएफ, कोंढवा (खु), साईबाबा नगर, ते तांबोळी बाजार, कोंढवा, भाग्योदय नगर.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button