पुणे – औषधात लघुशंका केल्याचा ठपका, प्रयोगशाळेतील तत्रज्ञांच्या आत्महत्या
औषधात लघुशंका केल्याच्या कारणावरून राजीनामा घेतलेल्या कामगाराने कंपनीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुंदराज शाहूराज गोरटे (वय-३२) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. तो गेली सहा वर्षे कंपनीत काम करत होता. 26 जूलै रोजी सुंदर यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुंदर हा हिंजवडीमधील औषध कंपनीत गेली सहा वर्षे झालं काम करत होते. मात्र एके दिवशी सुंदरने कंपनीत लघुशंका केली होती. हे सुरक्षा रक्षकाने पाहिले आणि संबंधित घटनेबद्दल लिहून घेऊन सुंदरला राजीनामा देण्यास लावला.

सुंदरने फेसबुक पोस्टवर मन मोकळे केले आहे. माझ्यावर दबाव आणून २३ आणि २४ तारखेला लिहून घेतले आहे आणि मला कंपनीमधून काढले. मी त्यांना सांगितले होते की, मला काढल्यानंतर मी जीव देईन तरीही मला काढले….आश्विनी मला माफ कर, अशा आशयाचा मजकूर सुंदरने फेसबुकवर लिहिलेला आहे. फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर कंपनीमध्ये जाऊन त्याने आपलं जीवन संपवले. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.





