Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये औंधचा आर्दश साधणार पंतप्रधानांशी संवाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/4-15.jpg)
पुणे |महाईन्यूज|
औंध मिलिटरी कॅम्पमधील केंद्रीय विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदर्श पी. नवलगुंड हा ‘परीक्षा पे चर्चा,’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कार्यक्रमातून पंतप्रधानासोबत संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम 20 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणार आहे.
महाराष्ट्रातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या एक लाख 340 विद्यार्थ्यांमधून 104 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आदर्शचे वडील पी. एस. नवलगुंड हे औंध मिलिटरी कॅम्प येथे भारतीय सेनेत कर्नल या पदावर सेवेत आहेत. आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन आपणही भारतीय सेनेत देशसेवा करणार असल्याचे आदर्शने सांगितले.
या निवडीसाठी त्याने ‘भविष्य आपकी आकांक्षा पर निर्भर’ हा निबंध सादर केला होता. त्याच्या निवडीचे औंध मिलिटरी कँम्प विभागाकडून अभिनंदन करण्यात आले.