पंतप्रधान मोदी येत्या शनिवारी ‘सिरम’ला देणार भेट
![Please Modiji, stop this! Doctors in the country complained to the Prime Minister about political leaders](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/modi.jpg)
पुणे – कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील ” सीरम इन्स्टिट्यूट ” कडे लागले आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (दि.28) रोजी पुणे दौऱ्यावर येत असून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसची निर्मिती आणि वितरणाची तयारी याचा आढावा घेणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांना दिली.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. जगात अनेक देशांमध्ये कोरोना लसीवर काम सुरू असून, अनेकांनी आपली लस अंतिम टप्प्यात आल्याचे जाहीर देखील केले आहे.
यामध्ये भारताने आघाडी घेतली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या लसीकडे संपूर्ण जगाचे लाक्ष आहे. यासाठीच तब्बल शंभर देशांचे राजदूत व संबंधित अधिकारी 4 डिसेंबर रोजी पुण्यातील सीरम व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देऊन लसी संदर्भात माहिती घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजदूत येण्यापूर्वी स्वत: मोदी पुण्यात येऊन सीरम मध्ये आढावा घेणार आहेत.
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा
- दुपारी 12.30 वाजता लोहगाव येथील टेक्निकल एअरपोर्ट आगमन
- लोहगाव येथून स्पेशल हेलिकॉप्टरने सीरम येथे आगमन
- दुपारी 1 ते 2 या एक तासात सीरम येथे आढावा
- दुपारी 2 वाजता सीरम येथून हेलिकॉप्टरने लोहगावा
- लोहगाव येथून हैद्राबादकडे रवाना