नवले पुलाजवळ विचित्र अपघात; 15 गाड्या एकमेकांना धडकल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/2Major_20Accident_20At_20navale_20Bridge_20Pune.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे शहरातील नवले पूलाजवळ विचित्र अपघात झाला आहे. जवळपास 15 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील नवले पुलाजवळ आज सकाळी हा अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात एकापाठोपाठ 15 गाड्यांनी एकमेकांना धडक दिली आहे. या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला असून वाहतूक ठप्प झाली. भरधाव ट्रकने समोर असलेल्या एक जीप आणि दोन गाड्यांना जोराची धडक दिली आहे. धडकेमुळे काही वाहनं ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे. या भरधाव ट्रकने जवळपास दुचाकी आणि तीन ते चार, चार चाकी गाड्यांना ट्रकची धडक बसली आहे. त्यात एका जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याचं कळतंय. तर आणखी चार जणांना नवले रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हा ट्रक कात्रजकडून देहूरोडच्या दिशेने चाललेला होता.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी धाव घेतली आहे. जखमी व्यक्तींनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे नवले पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्यात येत आहे.