breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मारुती सुझुकीची कार रेलिंग तोडून चक्काचूर

पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी कारला भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणाची जिवीतहानी झालेली नाहीये. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर तर 1 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे. या अपघातात  सुदीप घोश, शुभम फुंडे ,अनुराग मिश्रा, हे तिघे गंभीर जखमी झाले असून प्रसाद पाटील  किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्वजण उल्हासनगर मुंबई येथून मारुती सुझुकी सियाझ या कारने पुण्याकडे जात होते. एक्स्प्रेस वेवरील  गहुंजे स्टेडियमजवळ हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा पार चुराडा झाला आहे. भरधाव वेगात असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार  एक्स्प्रेस वेवर सुरक्षेकरिता  लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग तोडून उलटली. या कारचा वेग इतका होता की, महामार्गावर लावण्यात आलेल्या रेलिंग अक्षरश: तोडून दूर फेकले गेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button