breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दार उघड उद्धवा दार उघड, पुण्यात भाजपचे घंटानाद आंदोलन

पुणे |महाईन्यूज|

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. परंतु, गेले कित्येक दिवस मंदिरे उघडण्याची मागणी आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकारकडून याची दखल घेतली नाही. त्या विरोधात आज (शनिवारी दि.29) भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यात घंटानाद आंदोलने विविध ठिकाणी करण्यात आली.

पुण्यातील सारसबाग मंदिर, ओंकारेश्वर मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घंटानाद, टाळ वाजवून तर काही ठिकाणी गोंधळ घालून देखील आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले.

या आंदोलनाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजपशहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्धवा अजब तुझे सरकार, दार उघड उद्धवा दार उघड, पुरे झाले पुरे झाले, मंदिरांची दारे खुली करा यासारख्या घोषणा देत राज्य सरकारचा जोरदार घंटानाद करत निषेध नोंदवण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button