दहावीचा निकाल जाहीर ; ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. याबाबत शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान परीक्षा पार पडली.यावषीर्ही राज्यात मुलींनी बाजी मारली.यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश होता. विभागवार सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला होता.
विभागानुसार निकाल खालीलप्रमाणे :
– पुणे : 82.48
– नागपूर : 67.27
– औरंगाबाद : 75.20
– मुंबई : 77.04
– कोल्हापुर : 86.58
– अमरावती 71.98
– नाशिक : 77.58
– लातूर : 72.87
– कोकण : 88.30
* निकालाची वैशिष्ट्ये
एकूण 71 विषयांवर घेतल्या गेल्या परीक्षा
विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाइन बघता येणार निकाल
19 विषयांचा निकाल 100 टक्के
1हजार पेक्षा अधिक शाळांचा निकाल 100 टक्के