‘दंगल घडवण्याचा डाव आम्ही उधळला’ – प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/3.jpg)
पुणे |महाईन्यूज|
‘राज्यात सत्तांतर झाल्याने त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही लोकांकडून दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होता. हा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळून लावला, असे मत वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं. त्यानंतर ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळी राजकीय परिस्थिती बदलल्याने लोकांनी राजकीय दंगल घडवली. सध्याही राज्यात सत्तांतर झाले असून त्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा इथं दंगल घडवण्याचा डाव होता. हा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळून लावल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी अफवावंर विश्वास ठेवू नका, शांतता राखा असं आवाहन केलं.