breaking-newsपुणे
“त्या’ घरांचे पुन्हा पंचनामे
पुणे – मुठा उजवा कालवा फुटून बाधितांच्या घरांचे पंचनामे मंगळवारी जिल्हा प्रशासनाने केले. त्यानुसार दांडेकर पूल परिसरातील 113 घरांचे पंचनामे केल्याची माहिती देण्यात आली.
कालवा फुटून बाधित झालेल्या व पंचनामे करावयाचे राहिलेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिले होते. त्यानुसार महसूल विभागाच्या आठ पथकांनी उर्वरित पंचनामे करण्याचे काम मंगळवारी पुन्हा सुरू केले. त्यानुसार 113 घरांचे पंचनामे महसूल विभागाने केले आहेत. कालवा फुटल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले होते. त्यामध्ये 98 पूर्णत: बाधित तर 661 अंशत: बाधित घरांचे पंचनामे झाले होते. तथापि, काही घरांचे पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाकडून पुन्हा पंचनामे करण्यात आले आहेत.