Breaking-newsपुणे
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंदप्रकाश दीक्षितांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/71917859.jpg)
पुणे – ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
डॉ. दीक्षित गेल्या महिनाभरापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालातही दाखल करण्यात आले होते. आजारी असतानाही दीक्षित यांनी लिखाणाचा ध्यास सोडला नाही. एक पुस्तक ते लिहीत होते. या पुस्तकाचे लवकर प्रकाशन व्हावे, ही त्यांची इच्छा होती. दीक्षित यांच्या पश्चात चार कन्या असा परिवार आहे. डॉ. दीक्षित यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.