‘जे.डब्ल्यू मेरियट’ पंचतारांकित हाॅटेलच्या बाऊन्सवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/safetyandsecurity112_202002369164.jpg)
पुणे |महाईन्यूज|
जे डब्ल्यु मेरियट या पंचतारांकित हॉटेलमधील मायामी डान्सिंग क्लबमध्ये बाकावर आराम करीत असताना दोघा बाऊन्सरने तरुणीशी लज्जास्पद वर्तन करुन तिच्या बॉयफ्रेंडला शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघा बाऊन्सरवर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटना पहाटे २६ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता घडली आहे.
या घटनेमुळे पोलिसांच्या आर्शिवादाने पंचतारांकित हॉटेलमधील पब, डॉन्स क्लबमध्ये रात्रभर धिंगाणा सुरु असल्याचा जो आरोप नागरिकांकडून केला जातो, तो खरा असल्याचे आढळून आले आहे.
गुन्हे शाखेच्या वतीने ३१ डिसेंबरपूर्वी मोठ्या प्रमाणावर शहरात सर्च आॅपरेशन राबविले. त्यात उशीरापर्यंंत सुरु असलेल्या पंचतारांकित हॉटेल, पब, डॉन्सिंग क्लब यांच्यावर कारवाई केली होती. या पबवरही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही दिलेल्या वेळेनंतरही हा मायामी डान्सिंग क्लब सुरु असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी २२ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही तरुणी बालेवाडी येथील एका गर्ल्स होस्टेलमध्ये राहते.
ही तरुणी आपल्या एका मित्राबरोबर २५ जानेवारी रोजी जे डब्ल्यु मेरियट या हॉटेलमधील मायामी डान्सिंग क्लबमध्ये गेली़ मित्राबरोबर पार्टी करीत असताना पहाटे २ वाजता तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तेथील लाकडी बेंचवर ती आराम करीत होती. त्यावेळी क्लमधील दोन अनोळखी बाऊंन्सर तेथे आले व तिच्या दंडाला धरुन उठविले़ तसेच तिच्या अंगावर नको तेथे हात लावून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्याला तिच्या मित्राने विरोध केल्यावर त्याला या बाऊन्सरनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. या घटनेनंतर त्यांनी सोमवारी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.