Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
चाैंडी गावात आढळला अल्पवयीन मुलीचा सडलेला मृतदेह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/download-5.jpg)
जामखेड – चौंडी गावात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. मृत मुलगी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह तलाव परिसरात आढळून आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून तो कुजलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना चार दिवसांपुर्वी घडली असून आज ती उघडकीस आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुलीचा मृत्यू ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.